कर्जतकरांसाठी महत्त्वाचा निर्णय
आज नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब यांची भेट घेऊन कर्जत मतदारसंघातील विविध वाहतूक समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुख्यतः पुढील विषयांवर चर्चा झाली –
✅ कर्जत बायपास तातडीने पूर्ण करण्याबाबत
✅ आवळस – पळसदरी रेल्वे फ्लायओव्हर ब्रिज
✅ नेरळ रेल्वे क्रॉसिंगवर पर्यायी पूल
✅ कर्जत – भिसेगाव – गुडघे रेल्वे फ्लायओव्हर ब्रिज
✅ कर्जत परिसरातील इतर रेल्वे क्रॉसिंग व रस्ते प्रकल्प
गडकरी साहेबांनी या सर्व विषयांना सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे प्रशासनासोबत तातडीने बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.
या निर्णयामुळे कर्जतकरांच्या वाहतुकीच्या अडचणी कमी होऊन परिसरातील विकास प्रक्रियेला निश्चित गती मिळेल.
🙏 लडाख चे राज्यपाल माननीय कवींदरजी गुप्ता साहेब यांची लडाख भवन येथे सदिच्छा भेट घेतली.🙏
– सुनील गोगटे
आरोग्यदूत ओमप्रकाश शेटे साहेबांचे कर्जतमध्ये मनःपूर्वक स्वागत! 💐
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक थेट मदत गोरगरिबांपर्यंत पोहोचवणारे
आणि हे कार्य बघून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रातील 'आयुष्मान भारत योजना' प्रमुखपदाची जबाबदारी सोपवलेले
मा. ओमप्रकाश शेटे साहेब
यांनी आज माझ्या जनसेवा कार्यालयात सदिच्छा भेट दिली.
👉 त्यांच्या भेटीमधून आरोग्य विषयक कार्यातली त्यांची संवेदनशीलता, बांधिलकी आणि गोरगरिबांविषयी असलेली तळमळ अनुभवायला मिळाली.
👉 त्यांनी कर्जत मधील नागरिकांसाठी अधिकाधिक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष चर्चा केली.
👉 त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे कर्जतमध्ये जनतेसाठी उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्धार अधिक बळकट झाला.
🙏 ओमप्रकाश शेटे साहेब यांचा मनःपूर्वक सन्मान आणि आभारी आहोत!
हीच खरी लोकसेवा – जनतेसाठी, आरोग्यासाठी! 🙏
– सुनील गोगटे
💠करदात्यांच्या हितासाठी भारतीय जनता पार्टीचा ठाम पाठपुरावा 💠
आज भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने सुनील गोगटे यांच्या पुढाकाराने कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. तानाजी चव्हाण साहेब यांची भेट घेण्यात आली.
📌 दि. 19 मे 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार, 50% शास्ती माफी देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे.
📌 तसेच उर्वरित 50% शास्ती माफ करायची असल्यास, नगरपरिषदेस जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवणे आवश्यक आहे.
➡️ मात्र दुर्दैवाने, कर्जत नगरपरिषदेकडून अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने करदात्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
➡️ ही स्थिती लक्षात घेता, दोनही प्रस्ताव तातडीने पाठवावेत आणि कर्जतकरांना शासनाच्या निर्णयाचा योग्य लाभ मिळावा, अशी ठाम मागणी भारतीय जनता पार्टीने केली आहे.
महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार. स्थानिक आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे सुद्धा आभार.
🔷करदात्यांच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध आहोत!
🔷प्रत्येक नागरीकाच्या अडचणीसाठी आमचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच राहील.
याप्रसंगी सुनिल गोगटे महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा
राजेश लाड कर्जत शहर मंडल अध्यक्ष
विजय जिनगरे,अक्षय लाड ,दर्शन ठक्कर,अतुल बडगुजर,बिलाल आढाळ,शैलेश देशमुख,
वसंत महाडिक,सर्वेश गोगटे
यश ठाकरे,मिलिंद भोईर
विशाखा जिनगरे,गायत्री परांजपे
स्नेहा गोगटे,राधा बहुतुले असे बहुसंख्य भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते/p>
🙏 गुरुपौर्णिमा आणि ज्ञानदानाचा नवा अध्याय 🙏.
आज गुरुपौर्णिमा, ज्ञानाला वंदन करण्याचा दिवस. या पावन दिवशी मला एका नव्या ज्ञानमंदिराच्या उद्घाटनाचा मान मिळाला, याचा मला अपार आनंद व समाधान वाटत आहे.
आज भिसेगाव, कर्जत येथे नवीन सुरू होणाऱ्या
"सुवर्ण छाया बालविकास केंद्र इंग्रजी शाळा"
(Playgroup ते Senior KG)
या शाळेचे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झाले.
ही शाळा लहान मुलांसाठी आधुनिक शिक्षणपद्धतीने मार्गदर्शन देणार आहे. भिसेगाव व आसपासच्या परिसरात ही अशा स्वरूपाची एकमेव शाळा उपलब्ध झाली आहे, त्यामुळे पालकांची गैरसोय दूर होणार असून अनेक बालकांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळणार आहे.
आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशा एका "ज्ञानयात्रेच्या नव्या प्रवासाला" सुरुवात होताना, मनाला विशेष समाधान लाभले.
ज्ञानदान हेच खरे दान, आणि आज त्याचे एक नवीन दालन खुलं झालं – हे माझ्यासाठी भाग्याचे क्षण आहेत.
शाळेच्या संचालक, शिक्षकवृंद आणि पालक वर्गाला शुभेच्छा आणि भरभरून शुभाशय
🌱 शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ठाम पाऊल! 🚜
पावसाळा सुरू झाल्याने शेतकरी आपल्या शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरने शेतावर जात असतात. परंतु अलीकडे काही दिवसांपासून पनवेल आरटीओकडून शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. यामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले होते.
📝 या अन्यायकारक कारवाई विरोधात मी आणि माझे सहकारी यांनी तहसीलदार कर्जत यांना निवेदन दिले आणि त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली. शेतकऱ्यांना शेती करण्यापासून रोखणे म्हणजे त्यांचा हक्क हिरावून घेणे होय, हे मी स्पष्टपणे मांडले.
✅ तहसीलदार साहेबांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत पनवेल आरटीओ यांना पत्र पाठवून शेतीसाठी जाणाऱ्या ट्रॅक्टरवर अशाप्रकारची कारवाई करू नये अशी विनंती केली असल्याचे सांगितले.
🙏 ही कार्यवाही म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक पाऊल आहे. प्रशासनाने वेळेवर लक्ष दिले याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार!
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी मी सदैव कटिबद्ध आहे आणि भविष्यातही त्यांच्या हितासाठी ठामपणे लढत राहीन!
याप्रसंगी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे, कर्जत ग्रामीण मंडळाचे तालुका अध्यक्ष दिनेश रसाळ, किसान मोर्चा चे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर, किसान मोर्चा चे तालुका अध्यक्ष शिरीष कदम, कर्जतचे सरचिटणीस सूर्यकांत गुप्ता,युवा मोर्चा शहराध्यक्ष सर्वेश गोगटे,राव सर आदी उपस्थित होते
आपला सेवक,
🌱 सुनील गोगटे
खारघर येथे इस्कॉन मंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे आगमन झाले. त्यांना हेलिपॅडवर स्वागत करण्याचे भाग्य मला लाभले. या विशेष प्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन साहेब , मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब उपस्थित होते. त्यांच्या स्वागतानंतर मला नरेंद्र मोदी साहेबांचे स्वागत करण्याचा सन्मान मिळाला. जीवनातील सर्वोच्च आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण तो होता, जेव्हा मोदी साहेबांनी माझ्याकडे पाहून हसत विचारले, "कैसे हो आप?"
लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना
वासरे आणि पळसदरीवासीयांसाठी दिलासादायक पाऊल – पळसदरी पूलासाठी पुढाकार वासरे – कोंड्याला कर्जतशी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरणारा आवळस नेवाळी ते पळसदरी रेल्वे ओव्हर ब्रिज लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. यासाठी गेल्या काही काळापासून विविध राजकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. आज भारतीय जनता पार्टी, शिवसेना पदाधिकारी, गावकरी आणि रेल्वेचे अधिकारी एकत्र येत पळसदरी स्टेशन येथे प्रत्यक्ष पाहणी केली. कालच माननीय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी कर्जत-नेरळ परिसरातील समस्यांवर बैठक घेऊन पाहणीचे निर्देश दिले होते. या ब्रिजसाठी मी स्वतः रेल्वेमंत्र्यांकडे मागणी केली होती. त्यावर रेल्वे मंत्रालयाने कळवले की महाराष्ट्र शासन ५०% व रेल्वे ५०% खर्च करण्याच्या अटींवर प्रस्ताव सादर करावा असे पत्राद्वारे कळविले होते.या ब्रिजच्या उभारणीने वासरे खोंड्याच्या नागरिकांना आठ किलोमीटरचा फेरा वाचणार असून, खोपोली-लोणावळ्याकडे जाण्याचा मार्ग सुकर होणार आहे. रेल्वेचे इंजिनियर मा. कदम यांनी लवकरच याचे इस्टिमेट आणि फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करून प्रस्ताव सादर केला जाईल असे सांगितले. यावेळी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली व जनतेच्या दृष्टीने सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. या पाहणी प्रसंगी भाजप प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा सुनील गोगटे शिवसेना नेते संतोष शेठ भोईर, भाजपा सरचिटणीस *वसंत महाडीक, ऍड सचिन दरेकर, शुभम शिंदे, सुरज दळवी पत्रकार अभिजीत दरेकर, रघुनाथ निगुडकर, प्रकाश सुर्वे, नरेंद्र दरेकर, अँड प्रदीप सुर्वे, महेंद्र निगुडकर,रमेश मोरे,दादू दरेकर , कल्पेश दरेकर तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. वासरे-खोंड्याच्या जनतेसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे! आपल्या सहकार्याने ही स्वप्नपूर्ती लवकरच पूर्ण होवो, हीच अपेक्षा!देशभक्तीला पावसाचीही भीती नाही… आज कर्जत शहरात तिरंगा यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. धो-धो पावसातही देशप्रेमी नागरिकांनी ओलचिंब होत वीर जवानांच्या पराक्रमाला सलाम केला. हा उत्साह, हा जोश… हेच आमचं खरे बळ आहे! भारत माता की जय! वंदे मातरम्!
Sunil Gogate, Vice President of Bharatiya Janata Party Maharashtra Pradesh Kisan Morcha, Distributes Free Umbrellas to Needy Laborers
In a heartwarming gesture, Sunil Gogate, the Vice President of the Bharatiya Janata Party's Maharashtra Pradesh Kisan Morcha, distributed free umbrellas to needy laborers at the Police Ground in Karjat today. This kind act is a testament to Gogate's commitment to serving the community and improving the lives of marginalized workers.
As a prominent leader in the Bharatiya Janata Party, Gogate has been instrumental in various initiatives aimed at supporting farmers, laborers, and other underprivileged sections of society. His dedication to the welfare of the people has earned him widespread recognition and respect.
The distribution of 122 free umbrellas is a thoughtful gesture, considering the scorching heat and unpredictable rains that laborers often face while working outdoors. This small yet significant act of kindness will undoubtedly bring relief and joy to the recipients.
आज, दिनांक 5 जुलै 2024 रोजी सकाळी 8.30 वाजता, नाका कामगार, पोलिस ग्राउंड येथे गरजू व गरीब कामगारांसाठी उपाध्यक्ष सूनिलजी गोगटे यांच्या दानशूर व्यक्तिमत्त्वामुळे पावसाळी छत्रींचे वाटप करण्यात आले. त्यांच्या समाजसेवेच्या व्रतामुळे 24 तास, 365 दिवस तत्परतेने पुढाकार घेतला जातो. या कार्यक्रमात 122 छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
या क्षणी उपस्थित मान्यवर:
- सुनीलजी गोगटे
- शहर अध्यक्ष विजयजी जिनगरे
- सरचिटणीस सूर्यकांत गुप्ता
- दिनेश गनिगा
- राव सर
- युवा जिल्हा कोषाध्यक्ष मिनेशजी मसणे
- युवा अध्यक्ष सर्वेश गोगटे
- शीतल पाल
- युवा सरचिटणीस प्रियांश जैन
या सर्वांच्या उपस्थितीत गरजू व गरीब कामगारांना मदत करण्यात आली.
समाजसेवेला नेहमी तत्पर असलेल्या या सर्वांना धन्यवाद!
सुनीलजी गोगटे यांचा अभिष्टचिंतन सोहळा रॉयल गार्डन कर्जत येथे शेतकऱ्यांना खतांच वाटप करून संपन्न
माजी आमदार सुरेश भाऊ लाडांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश, देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश.
मोफत नेत्र चिकित्सा ,मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि आरोग्य तपासणी शिबिर भारतीय जनता पार्टी कर्जतच्या वतीने सेवा ही संघटन मानून सुनील गोगटे यांच्या जनसेवा कार्यालयात मंगळवार दिनांक 7 नोव्हेबेर 2023 रोजी मोफत नेत्र चिकित्सा ,मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले केले होते . त्यास नेहमी प्रमाणे उस्फूर्त प्रतिसाद लाभला. 117 लोकांनी याचा लाभ घेतला यात 14 लोकांना मोतिबिंदु आढ़ळला. त्यातील 9 लोकांना आज शंकरा आय हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिये साठी नेले. तसेच आरोग्य तपासणी मधे काही लोकांना मधुमेह गूढ़गे दुखी आढ़ळली. त्यांना औषधे देऊन उपचार करण्यात आले . शंकरा आय हॉस्पिटल आणि श्रीपाद आयुर्वेदिक क्लिनिक यांनी अतिशय उत्तम रित्या लोकांना तपासले आणि सल्ला दिला. याप्रसंगी माझ्यासह सरचिटणीस सूर्यकांत गुप्ता ,महिला मोर्चा शहराध्यक्ष शर्वरीताई कांबळे, चिंचवली ग्रामपंचायत सदस्य सुप्रियाताई भगत , मा तालुका अध्यक्ष महिला मोर्चा, स्नेहा गोगटे , सोनाली जाधव ,राधा बहुतुले, गीता कदम, पुनम डेरवणकर, तालुका आय टी सेल विराज पाटकर ,अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष गणेश गवई, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सर्वेश गोगटे, रवींद्र जाधव दर्पण घारे ,अजिंक्य भुंडेरे आणि इतर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
आज महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी कीसान मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र * वसंत स्मृती* दादर येथील कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब, प्रदेश सरचिटणीस विक्रांतजी पाटील साहेब, किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे साहेब आणि महाविजय 2024 लोकसभा प्रवास संयोजक बाळा भेगडे साहेब यांच्या हस्ते देण्यात आली. मा बावनकुळे साहेब विक्रांतजी पाटील साहेब बाळा भेगडे साहेब आणि किसान मोर्चा अध्यक्ष गणेश तात्या भेगडे साहेब यांनी अत्यंत विश्वासाने माझ्यावर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. मी त्यांचा खुप खुप आभारी आहे. त्यांनी टाकलेला विश्वास मी सर्वस्वी प्रयत्न करून भारतीय जनता पार्टी वाढविन आणि त्यांचा विश्वास सार्थ ठरविन.....
आज भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुनील गोगटे यांच्या जनसेवा कार्यालयात सेवा पंधरवडा अंतर्गत भारतीय जनता पार्टी कर्जत ,शंकरा आय हॉस्पिटल पनवेल आणि हार्मनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने नेत्रचिकित्सा शिबिर आणि मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यास लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये 66 जणांची तपासणी झाली त्यात 15 मोतीबिंदुचे रुग्ण आढळले. त्यातील पाच जणांना ऑपरेशन साठी शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले. तसेच अनेकांना अत्यल्प दरात चष्मे देण्यात आले. तसेच सर्वांची मधुमेय आणि रक्तदाब तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सेवाभावी कार्यकर्ते उपस्थित होते होते. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनील गोगटे, जिल्हा सरचिटणीस दीपकजी बेहेरे , जिल्हा उपाध्यक्ष वसंत शेठ भोईर,जिल्हा चिटणीस रमेश जी मुंढे फ्रेंड् ऑफ बीजेपी जिल्हा संयोजक नितीनजी कांदळगावकर तालुका अध्यक्ष राजेशजी भगत, नगरसेवक बळवंत घुमरे, मारुति जगताप, सौ स्नेहा गोगटे,सौ बिनिता घुमरे ,सौ प्रीती तिवारी सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी ,वसंत महाडिक,युवा मोर्चा अभिजीत पटेल,सर्वेश गोगटे ,युवा मोर्चा अभिषेक तिवारी ,कुमार कडू ,राजीव पाटकर, ज्योती कडू , माधवी मित्रगोत्री , मनीषा घारे,समीर सोहोनी, महेंद्र कांबळे , बिलाल आढाल,हरिश्चन्द्र मांडे,राजेश थत्ते,मकरंद गोगटे,चंद्रकांत शिवडेकर ,प्रशांत प्रभुणे,गणेश गवई, दर्पण घारे,पूनम देरवणकर इत्यादी उपस्थित होते.
आज माझ्या घरी मावळचे खासदार मा श्रीरंग आप्पा बारणे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी कर्जतच्या विविध समस्या बाबत चर्चा झाली. त्याच प्रमाणे महाजनसंपर्क अभियान मोदी @9 चे माहिती पत्रक दिले त्यावेळी खासदार असुन सुद्धा त्यांनी अतिशय नम्रपणे माहिती पत्रक घेत माहिती जाणून घेतली.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे साहेब यांनी माझ्या घरी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी कर्जतच्या विविध रेल्वे समस्या लांब पल्ल्याच्या गाड्या चे थांबे. यावर सविस्तर चर्चा झाली.दानवे साहेबांनी लवरात लवकर गाड्या कश्या थांबतील यासाठी नक्की कार्यवाही करतो असे आश्वासन दिले.
देशाचे लाडके पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस सेवा हेच समर्पण या भावनेतून भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात साजरा केला... देशाचे लाडके पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन भारतीय जनता पार्टीने देशभरात सेवा समर्पण पंधरवडा * 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यत आयोजित केला आहे. त्या अंतर्गत समाजाच्या शेवटच्या घटका पर्यंत जाउन गरीब, गरजू, कष्टकरी, शेतकरी ,दिव्यांग रुग्ण यांना भेटून त्याच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यांना यथाउचित मदत करावी अशी कानगिरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दिली. त्याचा एक भाग दिव्यांगाची सेवा म्हणुन भारतीय जनता पार्टी कर्जत युवक प्रतिष्ठान मुंबई आणि नवतरुण ॐ कार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने *श्रवण यंत्र वाटप शिबिराचे आयोजन साई मंदिर कोकण आळी दहिवली येथे आज पार पडले . या शिबिरात सुमारे जणांची तपासणी करून 36 लोकांना श्रवण यंत्र अत्यल्प दरात 500 रुपयात देण्यात आले. प्रचंड पाऊस असताना सुद्धा गरजू शिबिरात आले . त्यांना श्रवण यंत्र लावल्या नंतर व्यवस्थित ऐकू येऊ लागल्याने अतिशय आनंदी झाले. त्यांच्या चेहऱ्यावरील हसु पाहून युवक प्रतिष्ठान मुंबई यांचे ऐका सन्मानानी घोष वाक्य सार्थ झाले असे जाणवत होते. ह्या कार्यक्रमाचे आयोजन भाजप नेते सुनील गोगटे आणि नगरसेविका विशाखा जिनगरे यांच्या विशेष प्रयत्नानी झाले. याप्रसंगी जिल्हासरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव भोईर, तालुका सरचिटणीस संजय कराळे, विजय जिनगरे,सर्वेश गोगटे, ओंकार जिनगरे,बिराज पाटकर हरिश्चंद्र मांडे, सूर्यकांत गुप्ता, अभिनय खांगटे असे बहुसंख्य भाजप कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

पेण को ऑप बँक ठेवीदारांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित... केंद्रीय अर्थ मंत्री भागवत कराड यांना भाजपा नेते सुनील गोगटे यांनी दिले निवेदन

दिल्ली -केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची रायगड भाजपा नेते सुनील गोगटे यांनी घेतली भेट,उद्योगा संदर्भात दिले निवेदन

पेण बँक ठेवीदारांना दिलासा, ठेवीदारांना ९० दिवसात ५ लाख रुपये मिळणार; भाजप नेते सुनील गोगटे यांची माहिती

हिंदुस्थान इंसेक्टिसाईड लिमिटेड रसायनी हे भारत सरकारची कंपनीतील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप नेते सुनील गोगटे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा केला.

पेण बँक ठेवीदारांना दिलासा, ठेवीदारांना ९० दिवसात ५ लाख रुपये मिळणार; भाजप नेते सुनील गोगटे यांची माहिती




