भाजप नेते सुनील गोगटे यांचा "पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या" ठेवीदारांच्या हक्काच्या पैशांसाठी लढा व पाठपुरावा सुरूच
बातमीचा तपशील (विशेष बातमी - कर्जत / सुभाष सोनावणे):
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नागरिकांच्या "विश्वासाचा" आधार असलेल्या "पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या" अडकलेल्या हजारो/असंख्य ठेवीदारांचे किमान २५ लाखांपर्यंतचे पैसे परत मिळावेत, यासाठी भारतीय जनता पक्षाचे कोकण संपर्क प्रमुख/प्रदेश सचिव व कर्जत तालुक्यातील नेते "सुनील गोगटे" हे सातत्याने विविध स्तरावर पाठपुरावा करत आहेत. आज पुन्हा एकदा त्यांनी या "लढ्याचा पाठपुरावा" सुरू केला आहे.
पेण ठेवीदारांनी आपल्या आयुष्यभराची कमाई आणि कष्टाचे साठवलेले पैसे पेण बँकेत विश्वासाने ठेवले होते. त्यामुळे या सर्व ठेवीदारांना त्यांचे हक्काचे पैसे लवकरात लवकर परत मिळावे, हीच आपली प्रमुख भूमिका आहे.
या विषयासंदर्भात भाजप सरचिटणीस सुनील गोगटे यांनी "केंद्रीय अर्थ मंत्रालय तसेच केंद्रीय सहकार मंत्रालयाकडे" वारंवार पाठपुरावा केला आहे. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते मा. खासदार डॉ. विनयजी सहस्रबुद्धे आणि मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन या प्रश्नात मध्यस्थीची मागणी केली असून, वित्त मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करून ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती केली आहे.
".....टोरेंट – टाटा पॉवर – शिलार – पोशीर हे सर्व धरण प्रकल्प पर्यावरणाचा नाश करून नियमबाह्य पद्धतीने लादलेले, "भाजप किसान मोर्चाचा" कडाडून विरोध....."
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –कर्जत तालुक्यात येऊ घातलेले "टोरेंट – टाटा पॉवर – शिलार – पोशीर" हे सर्व धरणे प्रकल्प पर्यावरणाचा नाश करून नियमबाह्य पद्धतीने लादलेले असल्याने, भाजप किसान मोर्चाने यास कडाडून विरोध करत प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी या सर्व प्रकल्पांवर हरकत नोंदवली आहे.
या प्रकल्पांबाबतीत पश्चिम घाटाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये अधिसूचना काढून नियमात बदल करून आपल्यावर हे अन्यायकारक प्रकल्प लादण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी किसान मोर्चाच्या वतीने आणि स्वतः याला कडाडून विरोध करत असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी सांगितले आहे. हे अन्यायकारक प्रकल्प सर्व पक्षीय, सर्व संघटनांना विश्वासात घेऊन न होण्याच्या दृष्टीने सर्वांनी एकत्रित येऊन विरोध करणे, असे त्यांचे ठाम मत आहे, म्हणूनच त्यांनी हरकत नोंदवून आपला विरोध दर्शवला आहे.
२७ जुलै २०२६ रोजी केंद्र शासनाने पश्चिम घाट आणि पर्यावरण नियमावली बदल करण्यासाठी सात राज्यातील विविध पर्वत रांगातील गावे डिफाइन केली आहेत. त्यावरती सूचना आणि हरकती "६० दिवसात" घेण्याचे आहेत. म्हणूनच मी हरकत नोंदवलेली असून इतर सर्वांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती या बदलास हरकती घेतल्यास टोरेंट किंवा इतर आपल्या इथे होऊ घातलेले "विनाशकारी धरण प्रकल्प" बंदी आणता येतील, म्हणूनच सर्व बाधित गावातील नागरिकांनी, शेतकरी बांधवांनी हरकती आणि सुचनांचा मेल करावा, जेणेकरून आपल्यावर अन्यायकारक प्रकल्प लादण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याला आळा बसेल, असे आवाहन भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी केले आहे.
“पेण को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांचे पैसे मिळण्यासाठी सुनील गोगटे यांचे पुन्हा एकदा शर्थीचे प्रयत्न”
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या “जिव्हाळ्याचा प्रश्न” असलेल्या तर अनेकांचे सुखी जीवन “उध्वस्त” करणाऱ्या “पेण को-ऑपरेटिव्ह बँकेच्या” ठेवीदारांचे पैसे मिळण्यासाठी गेली अनेक वर्षे केंद्रीय पातळीवर प्रयत्न करणारे कर्जत मधील भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष “सुनील गोगटे” यांनी पुन्हा एकदा शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी त्यांचे मार्गदर्शक नेते, खासदार तथा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस “मा. श्री. विनोदजी तावडे साहेब” यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन कर्जत तालुक्यातील विविध विकासकामे व जनतेच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. तसेच रायगड जिल्ह्यातील पेण को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांचा अत्यंत ज्वलंत प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
रायगड जिल्ह्यातील पेण को-ऑपरेटिव्ह बँक बंद पडल्यामुळे हजारो ठेवीदारांचे कष्टाचे पैसे अडकले आहेत. केंद्र सरकारने २०२० मध्ये लागू केलेल्या कायद्यानुसार ठेवीदारांना ₹५ लाखांपर्यंतच्या ठेव रकमेसाठी विमा संरक्षण मिळावे, यासाठी केंद्रीय सहकार मंत्री “अमितजी शाह” यांच्याकडे आपल्या माध्यमातून प्रभावी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंती यावेळी सुनील गोगटे यांनी मा. तावडे साहेबांना केली.
यावर खासदार मा. तावडे साहेबांनी लवकरच “अमितभाई शाह” यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यापासून सुरू झालेला खासदार विनोदजी तावडे यांचा प्रवास, गाजवलेली विविध पदे, आमदार, शिक्षणमंत्री, विविध खात्यांचे मंत्री, खासदार आणि आज भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून केलेले कार्य प्रेरणादायी आहे.
सर्वसामान्यांचा आवाज आणि त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर “सकारात्मक मार्ग” काढण्याची त्यांची कार्यपद्धती सुनील गोगटे यांनी जवळून अनुभवली आहे. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की मा. विनोदजी तावडे साहेब या प्रश्नात वैयक्तिक लक्ष घालून पेण को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न करतील, असे प्रांजळ मत यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी व्यक्त केले.
नदी पात्रातील अतिक्रमणामुळे शेतीस आणि नागरी वस्तीस धोका – भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा आक्रमक
मौजे अडीवली ता. कर्जत येथे धनदांडग्यांनी नदी पात्रात प्रचंड भराव करून काँक्रीटची भिंत आणि पक्की घरे बांधत आहेत. गावकरी शेतकरी अनेक तक्रारी करत आहेत परंतु त्यांची दखल राजकीय वरदहस्त असल्याने कोणी घेत नाही. अशी तक्रार घेऊन शेतकरी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांना भेटले व त्यांना याबाबतीत लक्ष घालण्याची विनंती केली.
शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन भाजप किसान मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी यांनी तहसीलदार कर्जत यांची भेट घेतली. नदीपात्रातील बांधकाम आणि भराव हे CRZ चे नियम आणि पूरनियंत्रण नियमावली धाब्यावर बसवून सुरू असल्याचे सकृतदर्शनी दिसते. म्हणून शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने किसान मोर्च्याच्या वतीने बांधकाम योग्य नियम पाळून होत आहे की नाही याची चौकशी करून कारवाई करावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली.
या बांधकामामुळे अडीवली, बीड, आवळस, नेवाळी, शिरशे गावास पुराचा धोका वाढणार आहे. शेती, घरदारे यांचे नुकसान तर होईलच परंतु जीवितहानी सुद्धा होऊ शकते. असेच बांधकाम रॅडिसन ब्लू हॉटेलने सुद्धा केलेले आहे. त्यामुळे गेल्या पावसाळ्यात खांडपे आणि इतर परिसरात पूर येऊन शेती आणि घरादारांचे नुकसान झाले होते.
म्हणूनच हे बांधकाम त्वरित थांबवावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा सुनील गोगटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला. याबाबत NGT म्हणजे राष्ट्रीय हरित लवाद यांच्याकडे सुद्धा तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी सुनील गोगटे यांच्यासह किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष अतुल बडगुजर, सरचिटणीस जनार्दन म्हसकर, तालुका अध्यक्ष शिरीष कदम, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सर्वेश गोगटे, सरचिटणीस प्रियांश जैन, उपाध्यक्ष राज यादव, राहुल यादव, मिलिंद भोईर आणि शहर सरचिटणीस सूर्यकांत गुप्ता उपस्थित होते.
